August 19, 2022

राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन

Read Time:1 Minute, 52 Second

परभणी/प्रतिनिधी
येथील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने स्व.अ‍ॅड. शेषराव भरोसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि.०६ रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आणि माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आ.मोहन फड, आ.मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.अशोक ढवण, महोत्सवाचे आयोजक आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समर्थ कारेगावकर, वैभव खुडे, माणिकराव शिंदे, रेणुका देशमुख आदी प्रयोगशील शेतक-यांचा गौरव करण्यात आला.

या कृषी मेळाव्यातील स्टॉलना श्रीक़राड व श्री.लोणीकर यांनी भेटी देवून माहिती घेतली. कृषी महोत्सवास परभणी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कृषी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच कृषी विभाग, कृषि उत्पन्न बाजार समिती, कृषी विद्यापीठ, बी -बियाणे, कीटकनाशके, विविध प्रकारचे ट्रॅक्टर, शेतीपयोगी यंत्र अवजारे आदींचे २०० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen + 15 =

Close