राज्यभिषेकानिमित्त विद्यीर्थी मावळ्यांच्या वेशभूषेत

Read Time:1 Minute, 30 Second

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

राज्य शासनाकडून दि़ ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याच्या सुचना दिल्या होत्या़ यानूसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते मराठी माणसाचा मानबिंदू असणा-या या शिवस्वराज्य दिनानिमित्त गुढी उभारण्यात आली़ यावेळी स्वराज्य निर्मितीच्या या विशेष दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

नांदेड जिल्ह्यातील फत्तेपुर येथील शाळेतील विद्यार्थी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ़ सुनिल लहाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांच्यासह शिक्षक आणि नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 − five =