राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; तर विदर्भात यलो अलर्ट

Read Time:1 Minute, 37 Second

मुंबई : राज्यभरात काल पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. दरम्यान, अकोला, पुणे, मुंबईसह उपनगरांमद्धे अनेक भागात रात्री उशिरा पाऊस झाला. राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, राज्यात काल पुन्हा पावसाने चांगलीच हजेर लावली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

त्याचबरोबर आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला.

त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 3 =