राजू श्रीवास्तव आपल्या मागे सोडून गेले ‘इतक्या’ कोटींची संपत्ती!

Read Time:2 Minute, 8 Second

मुंबई | लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राजू हे स्टार्स आणि राजकारण्यांच्या मिमिक्रीसाठी ओळखले जातात. राजूने अनेक टीव्ही आणि स्टेज शोमध्ये काम केलं आहे. राजूचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांना 50 रुपये मिळायचे. मात्र यश मिळाल्यानंतर तो एका शोसाठी 5-10 लाख रुपये घेत असे.

राजू लहानपणापासून स्टेज शो करायचा. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या आहेत. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘बिग ब्रदर’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये ते दिसला.

कॉमेडी हा राजूंच्या कमाईचा मुख्य स्त्रोत होता. भारतात अनेक स्टेज शो करण्यासोबतच राजू हे अनेकदा परदेशातही कार्यक्रमांना जात असे. अनेक अवॉर्ड फंक्शन्स आयोजित करून आणि ब्रँड एंडोर्समेंट करून ते दरवर्षी प्रचंड पैसा कमवत असे.

राजू हे एनजीओ आणि ट्रस्टला भरपूर पैसे देत असे. याशिवाय गरिबांच्या मदतीसाठी ते अनेक चॅरिटी शोही करत. राजू श्रीवास्तव एका कॉमेडी शोसाठी लाख रुपये चार्ज करत. सध्या त्यांच्याकडे 15-20 करोडोची संपत्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − ten =