
राजीनामा देते; पण मुलाला तिकीट द्या
लखनौ : भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांनी मुलगा मयंक जोशी यांना लखनौ कैंटमधून तिकीट मिळावी यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मत मांडले. भाजपने खासदारांना तिकीट नाकारले आहे. पक्षाने ‘एक कुटुंब एक तिकीट’ जाहीर केले आहे. यामुळे जोशी यांच्या मुलाच्या तिकीट मिळण्यावर संशय आहे.
पक्षाने एका कुटुंबातील एका व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाल्यावर मी याबाबत पत्र लिहिले आहे. एखाद्याला निवडणुकीच्या राजकारणात यायचे असेल आणि दीर्घकाळ समाजसेवा करायची असेल तर त्याला तिकिटाची अडचण नसावी, असे रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या. २०२४ ची निवडणूक न लढवण्याची घोषणा मी आधीच केली आहे, असेही रिटा जोशी म्हणाल्या.
मला खासदारकी सोडून पक्षाचे काम करायचे आहे. विद्यमान खासदाराच्या मुलाला तिकीट देण्यात अडचण आल्यास आपण खासदारकी सोडण्यास तयार असल्याचे रिटा बहुगुणा यांचे म्हणणे आहे. रिता जोशी लखनौ कैंटमधून ज्या जागेवरून तिकीट मागत आहेत, तिथे भाजपच्या अनेक नेत्यांनी दावेदारी केली आहे. रिटा बहुगुणा जोशी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. रिटा सांगतात की त्यांचा मुलगा २००९ पासून राजकारणात सक्रिय आहे. लोकांसाठी काम करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा मयंक जोशी यांना तिकीट मिळायला हवी.