
राजस्थानमधून पाक गुप्तहेरास अटक
जयपूर : राजस्थानातील नसीराबाद आर्मी कॅम्पमधून एक पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. हा गुप्तहेर पार्किंगमध्ये बिल देण्याचे काम करीत होता. आरोपी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्व माहिती पाकिस्तानात पाठवित होता. याबदल्यात त्याला पैसेही मिळत होते.
इन्टेलिजन्स ब्यूरोला मिळालेल्या माहितीनुसार, किशनगड (अजमेर) येथे राहणारा मोहम्मद यूनुस याचे पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेशी संपर्क आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तो त्यांच्यासाठी काम करतो. आयबीने याबाबत लक्ष दिले तर आरोपीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आणि त्याला अटक केले. चौकशीदरम्यान गुुप्तहेराने सांगितले की, ब-याच काळापासून तो पाकिस्तानाच्या गुप्तचर यंत्रणेशी संपर्कात आहे. पाकिस्तानी अधिका-यांना तो मोबाइलवरुन माहिती देत होता. यासाठी त्याने एक बनावटी सिम कार्डही खरेदी केले होते.
लष्कराच्या हालचालीची माहिती पाठविली
आयबीने आरोपीचा मोबाइल आणि लॅपटॉप ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मोबाइलमध्ये नसीराबाद आर्मी कॅम्पचे अनेक फोटो आणि व्हीडीओसह आर्मीच्या हालचालीची माहिती पाक यंत्रणेसोबत शेअर केल्याचेही समोर आले आहे. आरोपीच्या बँक खात्यात पाकिस्तानातून पैसेही आले आहेत. आरोपी किशनगडच्या बस स्टँड जवळील पार्किंगमध्ये काम करीत होता.
अद्याप गुन्हा दाखल नाही
अद्याप त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आतापर्यंत या गुप्तहेराने पाकिस्तानला कोणकोणती माहिती पुरवली याचाही शोध घेतला जात आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांचाही तपास केला जात आहे. अटकेनंतर टीम आता किशनगडसाठी रवाना झाली आहे. याशिवाय आरोपीच्या बँक खात्यांचाही तपास सुरू आहे.