August 9, 2022

राजर्षी शाहू महाविद्यालयाला सर्वोत्­कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

Read Time:4 Minute, 1 Second

लातूर : महाराष्­ट्र शासनाच्­या उच्­च व तंत्रशिक्षण विभागाच्­या दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्­कृष्­ट महाविद्यालय आणि सर्वोत्­कृष्ट कार्यक्रमअधिकारी हे दोन्­ही पुरस्­कार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाकरिता येथील राजर्षी शाहू महाविद्यालयास सर्वोत्­कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्­कार तर महाविद्यालयातील राष्­ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्­याण सावंत यांची सर्वोत्­कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्­हणून निवड झाल्­याचे शासनाच्­या वतीने नुकतेच जाहीर करण्­यात आले आहे.

केंद्र शासनाच्­या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्­कृष्ठ काम करणा-या महाविद्यालय आणि कर्मचा-याचा सन्­मानित करण्­यात येते. त्­याच विचारावर आधारित महाराष्­ट्र सरकारच्­या वतीने राज्­यस्­तरावर राज्­याच्­या रौप्­य महोत्­सवी वर्ष सन १९९३-९४ वर्षापासून राष्­ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पुरस्­कार देण्­याची प्रथा सुरु करण्­यात आली आहे. त्­यानुसार महाराष्­ट्र शासनाच्­या उच्­च व तंत्र विभागाकडून राष्­ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०२०-२१ मध्­ये निस्­वार्थ भावनेने व निष्­ठेने समाज सेवा केल्­यामुळे स्­वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, अंतर्गत असलेल्­या राजर्षी शाहू महाविद्यालय (स्­वायत्त), लातूर ची सर्वोत्­कृष्ट महाविद्यालय म्­हणून निवड करण्­यात आली आहे.

महाविद्यालयातील राष्­ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्­याण सावंत यांची त्­यांनी राष्­ट्रीय सेवा योजनेच्­या मध्­यमातून केलेल्­या विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेत त्­यांची सर्वोत्­कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्­हणून निवड करण्­यात आली आहे. यापूर्वी देखील महाविद्यालयाने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्­या उल्­लेखनीय कामगीरीबद्दल शासन, विद्यापीठ आणि नामांकित संस्­थाकडून विविध पुरस्­काराने सन्­मानित करण्­यात आले आहे. महाविद्यालयाच्­या या यशस्­वी कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. महादेव गव्­हाणे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. राजू, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, उपप्राचार्य सुचेता वाघमारे यांचे आणि राष्­ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्­याण सावंत यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्­थेचे अध्­यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्­यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुध्­द जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे व अ‍ॅड. सुनिल सोनवणे इतर सदस्­य व राष्­ट्रीय सेवा योजनेतील सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्­पलता त्रिमुखे, डॉ. संभाजी पाटील, प्रा. सोमदेव शिंदे, प्रा. विजय गवळी आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + 12 =

Close