January 19, 2022

राजकारण्यांच्या कुटुंबियांमध्ये तु-तु-मै-मै! अमृता फडणवीस आणि निलोफर मलिक आमने-सामने

Read Time:1 Minute, 55 Second

कृझ प्रकरणात राजकारणाने शिरकवा केल्यापासून रोजच नवनविन प्रकार आणि नवनविन नावे बघायला मिळत आहे. अशांतच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांमध्ये कलगीतुरा रंगला असतांना, आता त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतल्याचे बघायला मिळते आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक खान यांनीसुद्धा आता आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. दोन राजकीय नेत्यांच्या वादात नेत्यांच्या कुटुंबियांनी पडणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडते आहे.

बिघडलेल्या नवाब मलिकांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आणि आरोप केले. प्रत्येकवेळी ते केवळ खोटे बोलले. त्यांना केवळ त्यांचा जावई आणि त्यांचा काळा पैसा वाचवायचा आहे असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनीसुद्दसा यावर सडेतोड प्रतिक्रिया दिलीय. तुमच्याकडे काही लपवण्यासारखे नसेल तर पत्रकार परिषदांची चिंता वाटायला नको. सत्य तुमच्या बाजुने असेल तर घाबरण्याची काही गरज नाही. जर काही वाईट गेतु असतील तर उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास गाच आमचा अजेंडा असल्याचे निलोफर मलिक म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × one =

Close