रस्त्यांवर मांसाहार विक्रीबंदीवरून संताप

Read Time:1 Minute, 53 Second

अहमदाबाद : अहमदाबाद महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या किना-यालगत लावण्यात येणा-या मांसाहारी पदार्थांच्या स्टॉल्स आणि हातगाड्यांवर कारवाई होत आहे. शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिघात येणा-या आजुबाजुच्या दुकानांवर ही कारवाई होत असून त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

अहमदाबाद महापालिकेच्या कर्मचा-यांनी दुकानांतील सामानासहीत गाड्याही ट्रकमध्ये भरल्या आहेत. पालिकेच्या कारवाईमुळे रस्त्यांवरचे विक्रेते मात्र चांगलेच चिडलेत. मांसाहारी पदार्थ ठेवणा-या रस्त्यांवरच्या गाड्यांवर कारवाई मात्र दुकानांत परवानगी, हा कुठला न्याय? असा प्रश्न या विक्रेत्यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतींवर कोणताही आक्षेप नसून घाणेरडे पदार्थ विकणा-या किंवा शहरांतील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळे निर्माण करणा-या दुकानांवर होत असल्याची सारवासारव केली आहे. दुसरीकडे अहमदाबाद महापालिका महसूल समितीचे अध्यक्ष जैनिक वकील यांनी रस्त्यांवर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदीची मागणी केल्याने भाजपचा दुटप्पीपणा उघड होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen + twelve =