January 19, 2022

रश्मी शुक्लांविरोधात महत्त्वाचे तपशील हाती असल्याचा दावा

Read Time:1 Minute, 33 Second

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगप्रकरणी आरोपी बनवण्यात आले नसले, तरी महत्त्वाचे तपशील त्यांच्याविरोधात हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात मांडण्यात आली.

तसेच कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण शुक्ला यांचा या प्रकरणी आरोपी म्हणून अद्याप समावेशच केलेला नसल्यामुळे राज्य सरकार त्यांना याप्रकरणी आरोपी करणार आहे की नाही, अशी विचारणा न्यायालयाने मागच्या सुनावणीच्या वेळी सरकारला केली होती. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याप्रकरणी सुनावणी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − three =

Close