रणवीर सिंग Nude Photoshoot प्रकरणाला नवं वळण, रणवीरने केलेल्या दाव्याने खळबळ

Read Time:1 Minute, 37 Second

मुंबई | अभिनेता रणवीर सिंगने (Actor Ranveer Singh) न्युड फोटो शूट केलं. त्यानंतर बाॅलिवूडमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली होती. यातच आता यासंबधी रणवीरने एक दावा केला आहे. ज्यामुळे पुन्हा एक खळबळ उडाली आहे. यामुळे या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे.

रणवीरच्या म्हणण्यानुसार, सोशल मिडियावर (Social media) सात फोटो त्यांने पोस्ट केले होते. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सात फोटोंपैकी एकही फोटो त्याच्या पोस्टचा भाग नव्हता.हा फोटो मॉर्फ (Morf) करुन एडिट करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे फोटोत दाखवलं गेलं आहे त्यापद्धतीने शूट झालं नसल्याचा दावा रणवीरने केला आहे.

रणवीरच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी हे फोटो फाॅरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (To the Forensic Science Laboratory) पाठवले आहेत. यामुळे रणवीर खरं बोलतो की खोटं हे निष्पन्न होईल.

चित्रात जर छेडछाड झाल्याचं निष्पन्न (turn out) झालं तर रणवीर सिंगला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. त्या फोटोत त्याचे खाजगी भाग दिसत असल्याने त्याला अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 5 =