युवकाची आत्महत्या की हत्या? – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-जवळपास 30 वर्षीय युवक अजब पध्दतीने मरण पावल्याचा प्रकार पाकीजा फंक्शन हॉलच्या एका झाडाजवळ दिसून आला आहे. प्रेताची परिस्थिती पाहता त्याने आत्महत्या कशी केली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भाने काही देण्याघेण्याचा व्यवहार होता असे मयत व्यक्तीचा भाऊ पोलीसांना सांगत असतांना अनेकांनी ऐकले आहे.
आजचा सुर्योदय झाल्यानंतर पाकिजा फंक्शन हॉलच्या पाठीमागील नाल्यात झाडाजवळ मिर्झा शाहेद बेग मिर्झा जावेद बेग या 30 वर्षीय युवकाचे प्रेत फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसले. या प्रेताची पाहणी केली असता चिकटपट्या लावून आत्महत्या केली असल्याचे दिसत असले तरी चिकटपट्या लावून आत्महत्या केल्याचा एकही प्रकार आजपर्यंत पाहायला मिळाला नाही. सोबतच मयत मिर्झा शाहेद बेगचे पाय गुडघ्यापासून जमीनीला टेकलेले आहेत. ही हत्या की, आत्महत्या शोध घेण्याचे काम आता नांदेड ग्रामीण पोलीसांचे आहे.


Post Views: 91


Share this article:
Previous Post: भाजप कार्यकर्त्यांमध्ये शब्द बाणांचा मारा

June 23, 2024 - In Uncategorized

Next Post: प्रसार माध्यमांनी आपला नंबर पहिला म्हणून उत्कृष्ट शिक्षकाची केली बदनामी

June 23, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.