January 19, 2022

युरोपातील १० देशांत लॉकडाऊन

Read Time:2 Minute, 51 Second

लंडन : युरोपमध्ये कोरोनाने थैमान माजवले आहे. याठिकाणी काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. २७ सदस्यीय युरोपियन युनियनमधील १० देशांमधील कोविड-१९ साथीची परिस्थिती चिंताजनक आहे. ब्लॉक डिसीज एजन्सीने ही माहिती दिली. युरोपियन सेंटर फॉर डिसीजेसने तयार केलेल्या अहवालानुसार बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, एस्टोनिया, ग्रीस, हंगेरी, नेदरलँड, पोलंड आणि स्लोव्हेनियामध्ये परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून, येथे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती डब्ल्यूएचओच्या वतीने देण्यात आली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ताज्या ब्रीफिंगमध्ये माहिती दिली आहे की, युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोनाव्हायरसची २ दशलक्ष प्रकरणे आहेत. त्याच वेळी, कोविड -१९ मुळे २७,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण जगामध्ये झालेल्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. विशेष बाब म्हणजे पूर्व युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, तिथे कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. त्याच वेळी, पश्चिम युरोपमधील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिथेही प्रकरणे वाढत आहेत. युरोप पुन्हा एकदा कोरोनाचे एपिक सेंटर बनत असल्याचे बनत असल्याचे समोर येत आहे. त्याच वेळी, अनेक युरोपीय देशांनी पुन्हा एकदा कोविड-१९ शी संबंधित नियम लावण्यास सुरुवात केली आहे.

अनेक जण पहिल्या डोसपासून वंचित
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्या ब्रीफिंगमध्ये सांगितले की, विशेषत: निरोगी लोकांना कोरोना बूस्टर डोस देण्यासाठी कोणतेही समर्थन केलेले नाही. डब्ल्यूएचओने सांगितले की, आजही जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि उच्च जोखीम श्रेणीतील लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

Close