युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर

Read Time:3 Minute, 28 Second

कीव (युक्रेन) : रशियाच्या हल्ल्याचा आणि बंडखोरांचा धोका लक्षात घेऊन युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित करण्याच्या योजनेला मान्यता दिली. याअगोदर युक्रेनच्या सर्वोच्च सुरक्षा अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या पूर्वेकडील डॉनेत्स्क आणि लुहांस्क हे दोन बंडखोर प्रदेश वगळता सर्व युक्रेनियन प्रदेशात आणीबाणी लागू केली जाणार आहे. युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिका-यांच्या म्हणण्यानुसार आणीबाणीची परिस्थिती ३० दिवसांपर्यंत लागू राहील. गरज भासल्यास यात आणखी ३० दिवसांची वाढ केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाला संबोधित करताना रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परस्पर पूर्व युक्रेनमधील दोन रशियन समर्थित फुटीरतावादी प्रदेश-डॉनेत्स्क आणि लुहांस्क-पीपल्स रिपब्लिक अर्थात स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा केली होती. तसेच रशियाने डॉनबासच्या डॉनेत्स्क आणि लुहांस्क या दोन्ही बंडखोर भागांत आपले लष्कर तैनात करण्याचेही आदेशही दिले आहेत. त्यानंतर युक्रेनमध्ये तातडीने आणीबाणी लागू करण्यात आली. युक्रेनच्या सुरक्षा परिषदेकडूनही राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित करण्याच्या योजनेला मान्यता दिली.

कच्चे तेल, नैसर्गिक वायू होऊ शकतो महाग
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास जागतिक स्तरावर विपरित परिणाम होण्याचा धोका आहे. अर्थात, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू अधिक महाग होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर उच्चांकावर पोहोचू शकतात. सध्या युक्रेन-रशियात तणाव वाढला आहे. त्यात पूर्व युक्रेनमधील बंडखोरांनी आपल्या प्रभावाखालील क्षेत्राला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यातून युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

युक्रेनमध्ये नागरिकही रणांगणात
रशियाच्या आणि बंडखोरांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोलदिमीर जेलेन्स्की यांनी १८ ते ६० वर्षांच्या नागरिकांना (राखीव नागरिकांचे दल) कमीत कमी एका वर्षांच्या अनिवार्य लष्करी सेवेसाठी पाचारण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two + 4 =