‘या’ शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वाईट बातमी!

Read Time:1 Minute, 50 Second


मुंबई | स्पाइसजेटच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वाईट बातमी समोर आलीये. स्पाइसजेटवर DGCA कडून कारवाई करण्यात आली. 50 टक्के उड्डाण स्थगित ठेवण्याच्या निर्णय DGCA कायम ठेवला आहे.

ऑक्टोबर अखेरपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे स्पाइसजेट कंपनीच्या शेअरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारातील स्पाइसजेटच्या किंमती दिवसेंदिवस खाली येत आहेत. त्यामुळे आणखी तोट्याची वाट पाहण्यापेक्षा असलेले शेअर्स काढून टाकण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आज मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 40.05 रुपये आहे. ही 4.30 टक्क्यांनी घसरल्याचं सांगितलं जात आहे.

स्पाइसजेटमधील तांत्रिक बिघाडांची अनेक प्रकरणे चर्चेत आहेत. बर्‍याच विमानांनी आपत्कालीन लँडिंग केल्याच्या घटना समोर आल्या. ज्यामुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण झाल्या.

 

थोडक्यात बातम्या- 

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर; कंपनीने केली ‘ही’ मोठी घोषणा

“आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल”

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × one =