‘या’ बड्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Read Time:2 Minute, 45 Second


मुंबई | शिंदे गटात सामिल झालेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा रत्निगिरीत दाखल झाली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर रामदास कदम यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना माहित आहे. कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा शंभर खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. अडीच वर्षात कधी बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

वारंवार खोक्यांचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवरही आता लोकांना संशय येतोय. खोक्यांची भाषा आदित्य ठाकरे आणि मातोश्रीनी करू नये. आत्मपरिक्षण केलं तर एवढं वणवण भटकण्याची गरज पडणार नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे.

तुम्ही माझ्याही बाबतीत तेच केलंत. आठ दिवस माझ्या बाजूला येऊन बसलात. काका.. काका.. म्हणत शिकले. प्लास्टिक बंदीचा कायदा मीच केला म्हणाले. बाबा मुख्यमंत्री. मला बाजूला केलं. माझंच खातं घेतलं. याला गद्दारी म्हणत नाहीत का? असा सवाल रामदास कदम यांनी केलाय.

रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली. चिपळूणचे चीनपाट नाच्या आमदार भास्कर जाधव याची अवकात आहे का? आपण त्याचे कधी पाय धरले? आपण केशवराव भोसले यांच्या गादीवर ड्राइव्हर होतो असे बोलतो ते केशवराव भोसले अजून जिवंत आहेत त्यांना विचारा, असं रामदास कदम म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व आहेत”

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + eighteen =