‘या’ कारणामुळे नितीन गडकरी आणि अक्षय कुमार ट्रोल

Read Time:2 Minute, 15 Secondमुंबई | अक्षय कुमार हा एक समजूतदार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक जाहिराती या प्रबोधनपर (Enlightenment) असतात. समाजाला एक संदेश देणाऱ्या असतात. तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी  हे सुद्धा रस्तेसुरक्षेसाठी नव्या योजना आणत असतात.

काही दिवसांपूर्वी सायरस मिस्त्री यांंच्या गाडीचा अॅक्सिडेंट झाला. त्यानंतर गाडीच्या सेफ्टी बद्दल तसेच रस्त्यांबद्दल अनेक प्रश्न उसस्थित केले जाऊ लागले. यानंतर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी (Union Minister Nitin Gadkari) वाहतूक नियमांबाबत काही घोषणाही केल्या.

गाडीत सहा एअरबॅग्ज असणं महत्वाचं आहे. यासंबधी एक जाहिरात केंद्रिय वाहतूक मंत्रालयाकडून (Union Ministry of Transport) करण्यात आली आहे. ही जाहिरात एका मिनिटाची असून ती नितीन गडकरी यांच्या ट्विटर हॅडलवरुन ट्विट करण्यात आली आहे. यामध्ये या जाहिरातीला हुंड्याचे वळण देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले सरकार यातून अधिकृतरीत्या हुंड्याचं समर्थन करत आहे, हे दुर्दैवी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अशा जाहिराती कोण मंजूर करतं? की हुंड्याच्या गुन्हेगारी कृत्याला प्रोत्साहन करण्यासाठी केलीय असा सवाल केला आहे. अनेकांनी यापेक्षा रस्त्याचं डिझाईन, बांधणी यावर भर दिला पाहिजे. असं म्हणलं आहे.

थोडक्यात बातम्याLeave a Reply

Your email address will not be published.

fifteen − 5 =