‘यांना जर मस्ती चढली असेल तर’; सभागृहात जयंत पाटलांचा पारा चढला

नागपूर | राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला (Goverment) धारेवर धरलं. सलग दुसऱ्या दिवशी देखील सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना जयंत पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून सध्या दोन्हीकडील वातावरण चांगलच तापलं आहे. जयंत पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ‘कर्नाटकच्या-मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेलं नाही, असं कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलॉन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे?, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.