May 19, 2022

यांना आता घरी बसविले पाहिजे

Read Time:2 Minute, 15 Second

बीड : आता पक्षात येतो का अन्यथा बघू तुला, तुझ्यावर केस करतो अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता. कृपया पालकमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका. मी दुर्गाष्टमीनिमित्त सांगते, माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. चांगले दिवस परत आणण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतोय. आम्ही लढायला पाय रोवून उभे आहोत. मुंडे साहेब दुबईच्या गुन्हेगाराला घाबरले नाहीत, त्या मुंडे साहेबांचं रक्त आमच्या अंगात आहे. दस-याच्या आधी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, शेतक-यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या आडून ठाकरे सरकारला इशारा दिलाय.

आम्ही जनतेसाठी यांना सवलत दिली
सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणे हे आमचे विरोधी पक्ष म्हणून दायित्व आहे. आज दुर्गाष्टमी आहे. सत्ताधारी माफिया राज चालवित आहेत. सत्ता प्रस्थापित होऊन दोन वर्षे होत आली. यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही जनतेसाठी यांना सवलत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × one =

Close