May 19, 2022

यशोधरा नगर महिला धम्म शिबिर संपन्न

Read Time:2 Minute, 3 Second

नांदेड दि.१९-भारतीय भारतीय बौद्ध महासभा सिडको शहर शाखेच्या वतीने यशोधरानगर सिडको  गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपासिका महिला धम्म शिबिराचा समारोप सिडको शहर शाखेचे अध्यक्ष सुभाष डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे सचिव संबोधी सोनकांबळे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष पी. एम. वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या महिला उपासिका शिबिरात ४१ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बौद्ध धम्माचे आचरण व अनुशिलन या सह धम्मविषयक बाबीवर प्रवचन व मार्गदर्शन केंद्रीय शिक्षिका सुजाता आढाव यांनी दहा दिवस विविध विषयावर मार्गदर्शन केले.

प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. शिबिरार्थी महिलांनी दहा दिवसांच्या धम्मा शिक्षणावर अनुभव कथन केले तर प्रमुख अतिथी संबंधी सोनकांबळे यांनी धम्मविषयक चळवळीला गतिमान करण्याचे आवाहन केले.

शिबिराच्या समारोप प्रसंगी यशोधरा नगर येथील महिला नागरिक यांच्यासह परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर जिल्हा शाखेचे बि .डी .कांबळे, नरसिंग दरबारे, के .जी .गोडबोले  वेंकटरावजी गजभारे , हरी कसबे दाताळकर , संभाजीराव पैठने चंद्रकांत सौदंते.  गोधने सर, आदींची विशेष उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

six + 6 =

Close