मौजे कौठा ता.बिलोली येथे 2 लाखांचा ऐवज लंपास – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)- मौजे कौठा ता.बिलोली येथे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 3 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना 26 एप्रिलच्या सकाळी 9.30 ते रात्री 8 वाजेदरम्यान घडली आहे.
शेख सलीम आयात साब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे कौठा ता.बिलोली येथील त्यांच्या घराचा कुलूप कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात आणि किचन रुममध्ये पातेल्याखाली ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 3 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 28






Share this article:
Previous Post: हेलीकॉप्टरने अमरनाथ यात्रेचे स्वप्न फसवणूकीने भंग झाले

April 29, 2024 - In Uncategorized

Next Post: पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

April 29, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.