January 21, 2022

मोहोळ तालुक्यात पावसासह विजांचे थैमान नजिक पिंपरी येथील शेतकरी ठार

Read Time:2 Minute, 52 Second

मोहोळ (राजेश शिंदे) : मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावात वीज पडून एक म्हैस ठार .परतीच्या पावसामुळे मोहोळ तालुक्यात शनिवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून जीवित हानी झाली . यामध्ये नजीक पिंपरी येथील एक शेतकरी ठार तर दुसरा शेतकरी गंभीर जखमी झाला . पोखरापूर येथे घराच्या दरवाज्यात वीज पडल्याने धक्का बसून एका इसमाच्या डोक्यात लोखंडी खिळा घुसला आहे तर कोन्हेरी येथे वीज अंगावर पडल्याने एका शेतकऱ्याची म्हैस जागीच ठार झाली .

परतीच्या पावसाने मोहोळ तालुक्यात धुमाकूळ घातला असून वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने विजा पडण्याच्या घटना मध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे . शनिवार ९ ऑक्टोबर रोजी नजीक पिंपरी येथील शेतकरी बाळू गोविंद सरवदे ( वय ५२ वर्षे ) व त्यांचा मोठा भाऊ प्रकाश गोविंद सरवदे ( वय ५५ वर्षे ) हे दोघे तांबोळे गावच्या हद्दीत शेतीची कामे करीत होते . दुपारी पावणेतीन वाजता पावसाला सुरुवात होऊन बाळू सरवदे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले तर प्रकाश सरवदे हे किरकोळ जखमी झाले .

पोखरापूर येथील मारुती कडापा लेंगरे हे घराच्या दरवाज्यात थांबले होते . यावेळी त्यांच्यासमोर वीज पडल्याने धक्का बसून ते बाजूला ते पडले . यावेळी एक मोठा लोखंडी खिळा त्यांच्या डोक्यात खोलवर घुसल्याने ते गंभीर जखमी झाले . त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयांत पाठवून देण्यात आले . कोन्हेरी येथे देखील वीज पडल्याची घटना घडली आहे . शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता जनार्दन माहिपती मुळे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली आहे . दरम्यान तिन्ही घटनांची नोंद महसूल प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 4 =

Close