मोदी सरकारकडून दिवाळीला ‘महागाई’ भेट

Read Time:2 Minute, 6 Second

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी केंद्रावर टीका करताना म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ ‘आझादी का अमृत महोत्सव’ पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ केल्याबद्दल स्मरणात राहील. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून महागाई दिल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, ते पाहता मोदी सरकारने जनतेला महागाईची दिवाळी भेट दिली आहे, असे गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले, ‘आधीची सरकारे सणांच्या आधी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत असत, जेणेकरून सर्वसामान्यांना सण आनंदाने साजरा करता यावा. गेहलोत यांनी सांगितले की, दिवाळीच्या फक्त तीन दिवस आधी, मोदी सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती २६६ रुपयांनी वाढवून मिठाई महाग करण्याची व्यवस्था केली आहे.

पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११६ रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर १०८ रुपये झाले आहेत, तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर एका वर्षात ५९८ रुपयांवरून ९०३ रुपयांपर्यंत ३०५ रुपयांनी वाढले आहेत. आमच्या सरकारने गुणवंत विद्यार्थिनींना महाविद्यालयात जाण्यासाठी स्कूटीचे वाटप केले, पण मुली मोदी सरकारला विचारत आहेत की एवढे महाग पेट्रोल कसे विकत घ्यायचे?, असेही गेहलोत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 − 5 =