मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Read Time:1 Minute, 49 Secondअमरावती | राजकारणात सध्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं (MP Navneet Rana) नाव चर्चेत आहे. लव जिहादच्या संशयातून नवनीत राणा यांनी अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हुज्जत घातली होती.

अमरावतीतील एक तरुणी बेपत्ता झाली होती. ती लव जिहाद (Love Jihad) प्रकराणातून पळवून नेल्याचा आरोप राणांनी केला. त्याच शहरातील एका तरुणावर असा आरोप राणांनी केला होता. यामुळे तरुणाच्या वडिलांनी नवनीत राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल (Complaint filed) केली आहे.

राणांच्या वागण्याचा आमच्या कुटुंबीयांना त्रास झाला असून आमची बदनामी झाली आहे. आमच्या मुलाला धमकी दिल्याने तो भयभीत झाला आहे, अशी तक्रार तरुणाच्या वडिलांनी दाखल केली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यावर अदाखलपात्र (Indictable offence) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी एका पोलीस पत्नीनं सुद्धा राणांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पोलिसांसोबत हुज्जत घालणं आणि मुलाला धमकावणं नवनीत राणांच्या अंगलट आलं आहे..

थोडक्यात बातम्या

“…तर आणखी काही संजय राऊत निर्माण होतील”

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारीLeave a Reply

Your email address will not be published.

eight + 11 =