मोठी बातमी! छगन भुजबळ पुन्हा एकदा जेलमध्ये जाण्याची शक्यता

Read Time:1 Minute, 40 Second


मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिसात फिर्याद दिली आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अज्ञात फोन आला होता.

व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमक्या देणारे व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले. ज्यात त्यांना शिवीगाळ सुद्धा घेण्यात आली आहे. यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्ही तुझ्या पाठीशी दुबईची लोक लावीन, भुजबळ साहेबांना मेसेज करणं तुला महागात पडेल, अशा शब्दात टेकचंदानी यांना धमक्या आल्या असल्याची पोलिसांत तक्रारीत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

CNG गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!

…म्हणून केरळच्या ‘या’ डॉक्टरचं सोशल मीडियावर होतंय कौतूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 1 =