मोठी बातमी! अमोल मिटकरींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Read Time:1 Minute, 18 Second


मुंबई | मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.

आम्हाला मंत्रिपद मिळेल, असं वाटत नाहीय. त्यामुळे आम्ही शिंदे-फडणवीस सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत आहोत, असे जवळपास 12 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे त्यांची नोंद आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

seven + three =