
मोठा दिलासा..रुग्णवाढीत मोठी घट, दिवसभरात ७१ हजार, तर गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात येत आहे. गेले काही दिवस ७० हजारांच्या घरात गेलेला दैनंदिन रुग्णवाढीच आकडा ४८ हजारापर्यंत खाली आला असून, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात ७१,७३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मागच्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागालाही विळखा घातला आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचे परिणाम दिसायला लागले आहेत. मुंबई, पुण्यासह ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात यायला लागली आहे.[woo_product_slider id=”480″]
आज ७१,७३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ३६ लाख १ हजार ७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९२ एवढे झाले आहे. आज राज्यात ४८,७०० नवीन रुग्णांचे निदान, तर ५२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली .सध्या राज्यात ३९ लाख ७८ हजार ४२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये, तर ३० हजार ३९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.