मोटेगावकर सरांचे RCC घेणार रविवारी NEET रिपीटर बॅचसाठी स्कॉलरशिप परीक्षा

मोटेगावकर सरांचे RCC घेणार रविवारी NEET रिपीटर बॅचसाठी स्कॉलरशिप परीक्षा

5 जून पासून रिपीटर बॅच सुरु

लातूरच्या शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करून संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात आपल्या शैक्षणीक गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या RCC ने विद्यार्थ्यांचा कल व गरज ओळखून RCC च्या सर्व शाखांत पुन्हा एकदा NEET परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रिपीटर बॅचची निर्मिती करून महाराष्ट्राच्या शिक्षण पॅटर्न मध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात करीत आहे. NEET Repeat करणाऱ्या विध्यार्थ्यांना RCC यशाचा कानमंत्र देणार आहे. त्यामुळे या विध्यार्थ्यांसाठी RCC आपल्या 10 शाखेमध्ये ऑफलाईन रविवार दि. 19 रोजी स्कॉलरशिप परिक्षा घेणार आहे या परीक्षेची नोंदणी www.rccpattern.com या वेबसाईट करण्याची सुविधा उपलब्ध आहे .नोंदणीकृत विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळ व ठिकाण sms द्वारे कळविण्यात येईल .परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना फीस मध्ये 100 टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे .NEET मध्ये यशस्वी होण्याची आणखी एक संधी RCC विद्यार्थ्यांसाठी निर्माण करीत आहे. रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 जून पासून पहिली बॅच सुरु होत आहे.

RCC इन्स्टिट्यूट ने नेहमीच येथील विध्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची सोय व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असते. NEET रिपीटर बॅच देखील त्याचाच एक भाग आहे. NEET ची तयारी करताना अनेक विध्यार्थी गुणवत्ता असून देखील त्यांना मागील दोन वर्षात चांगली कामगिरी करता न आल्यामुळे ते परीक्षेत अपेक्षित यश गाठू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी RCC कोचिंग अतिशय चांगले आणि अचूक मार्गदर्शन देण्यात महत्त्वपूर्ण रोल निभावू शकते. NEET ची तयारीची सुरूवात लवकर करणे खूप गरजेचे आहे कारण एका वर्षात दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थी व शिक्षकांवर असते .RCC आपल्या आतापर्यंतच्या अनुभवावर विध्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कन्सेप्ट कव्हर व्हावेतव ,गुण वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठराव्या या दृष्टीकोनातून

असंख्य स्टडी मटेरियल तसेच शॉर्ट नोट्स तयार करून उपलब्ध करून देते.

आयएमपी स्टडी मटेरियल स्वतः सर व आरसीसी ची पूर्ण टीम स्वतः अभ्यास करून मायक्रो प्लॅनिंग करून या नोट्स तयार करतात.

याचा विध्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी चांगलाच फायदा होतो.

नियमित सराव , मॉक टेस्ट्, मागील वर्षांचे पेपर्स सोडविणे, सकारात्मक आणि प्रेरित राहणे, या गोष्टींची NEET सारख्या परीक्षेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची तयारी मोटेगावकर सरांचे कोचिंग इन्स्टिट्यूट करुन घेते. शिवाय RCC कोचिंग इन्स्टिट्यूट ने गुणवत्तेचा एक बेंचमार्क सेट केला आहे. आतापर्यंत चा रिझल्ट पाहता व सातत्याने उंचावता आलेख पाहता विद्यार्थ्यांना देखील हमखास यशाची खात्री वाटते.

RCC कोचिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना एक संरचित अभ्यास योजना आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळवून देते. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबत असलेला गोंधळ संपून त्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होऊ शकते .याशिवाय आपली तयारी किती झाली आहे. व आपली अभ्यासातील कमजोरी काय आहे याचे मूल्यमापन स्वतःला करता यावे यासाठी या इन्स्टिट्युटच्या माध्यमातुन नियमित सराव सत्र घेतले जाते. यामुळे विध्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या कुवतीची जाणीव होते. आपली आपल्या अभ्यासातील कमकुवत बाजू काय आहे. हे लक्षात आल्यानंतर विध्यार्थी त्यावर जास्त लक्ष केंद्रीत करून आपली अभ्यासातील उणीव भरून काढू शकतात. याचा फायदा विद्यार्थ्यांच्या अध्ययनात नक्कीच होतो.यासोबतच या इन्स्टिट्यूट मध्ये स्पर्धात्मक वातावरण असल्यामुळे विध्यार्थ्यांना सतत प्रेरित करण्यासाठी व फोकस्ड राहण्यासाठी मदत होते.

NEET रिपीटर बॅचची वैशिष्ट्ये ;

नुकतेच झालेल्या 2024 च्या NEET परीक्षेत जे विद्यार्थी RCC मध्ये पूर्वी शिकत होते त्यांना विशेष सवलत ,ज्या विध्यार्थ्यांना 400 + गुण मिळाले आहेत अशा विध्यार्थ्यांना या बॅच साठी विशेष सवलत मिळणार आहे. याशिवाय 400 + गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅच, NEET 2024 मध्ये कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक पक्के करण्यासाठी वेगळी बॅच, याबरोबरच फिजिक्स मुळे NEET क्रॅक करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी Numerical practice , साठी स्वतंत्र बॅच राहणार आहे. त्यामुळे वेगवेगळया कॅटेगरीच्या विध्यार्थ्यांना NEET साठी तयारी करण्यास सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेने RCC ने NEET रिपीटर बॅचची निर्मिती केली आहे.

Share this article:
Previous Post: डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी-जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांचे आवाहन

May 14, 2024 - In Uncategorized

Next Post: इतवारा भागातील जुगार अड्डा कोणाच्या बिटचा? – VastavNEWSLive.com

May 15, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.