January 22, 2022

मोकाट फिराल तर रट्टे खाल.. | पोलिस अधीक्षकांचा नवा फंडा

Read Time:4 Minute, 18 Second

नांदेड : राज्यात १ मे पासून पुन्हा एकदा लॉकडाऊ न लागण्याचे संकेत राज्य शासनाने दिले असून उद्या ३0 एप्रिल रोजी औपचारीक घोषणा करण्यात येणार आहे. २२ एप्रिल ते ३१ मे दरम्यान झालेल्या लॉकडाऊ नमध्ये नांदेडकरांना पोलिस अधीक्षकांनी कडक पाऊले न उचलता नरमाईची भूमिका घेतली होती. परंतु नव्या लॉकडाऊ नमध्ये पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे नव्या लॉकडाऊ नमध्ये नवा फंडा अंमलात आणत मोकट फिराल तर रट्टे खाल.. चा इशारा दिला आहे.

राज्य शासनामार्फत २२ एप्रिल ते ३0 एप्रिलचा लॉकडाऊ न राज्यात लागू होता. नांदेड शहरात हा लॉकडाऊ न कडक करण्याच्या दृष्टीकोणातून पोलिस विभागाकडून पाऊ ले उचलण्यात आली होती. प्रमुख रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आले होते. २३ एप्रिल रोजी काही प्रमुख चौकात पोलिसांमार्फत विचारणा देखील झाली. परंतु यावेळी नांदेडकरांनी पोलिसांना झांसा दिला. प्रत्येकजण माझे आई वडिल, भाऊ, काका आदीचे नाव घेत रुग्णालयात दाखल असल्याचे दाखले दाखवत होते त्यामुळे पोलिसांनी देखील कडक पवित्रा न घेता नमती भूमिका स्वीकारत नांदेडकरांना रुग्णांसाठी डब्बे, औषध आदी व्यवस्थेसाठी वेळ दिला. परंतु याचा फायदा घेत अनेक मोकाट मात्र प्रमुख रस्त्यावरुन बिनधास्त फिरत होते.

त्यामुळे प्रसिद्धी माध्यमातील प्रतिनिधींनी पोलिस विभागाच्या बातम्या दिल्या असल्या तरी नांदेडकरांचे दु: ख लक्षात घेवून त्यांना ही सवलत दिली होती असे आजघडीला सांगितल्या जात आहे. परंतु येणा-या नव्या लॉकडाऊ नमध्ये आता नांदेडकरांचे कुठलेही कारण ऐकण्यात येणार नाही. पुरावा असेल तरच संधी दिली जाणार आहे. संबंधीत कर्मचा-यांनी देखील ओखळपत्र बाळगणे अनिवार्य करण्यात येणार आहे. चौका चौकात पोलिस विभागातील कर्मचारी उपस्थित राहून कडक तपासणी करणार आहेत. यासाठी पोलिस विभागातील कर्मचा-यांची विशेष बैठक पोलिस अधीक्षकांनी नुकतीच घेतली असून या संदर्भात कर्मचा-यांना कडक सूचना दिल्या आहेत.

आजपर्यंत सौम्य भूमिका निभावणारे पोलिस अधीक्षकांनी यावेळी कडक भूमिका घेतल्यामुळे अधिकारी, कर्मचा-यात चर्चेचा विषय झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी देखील कडक निर्बंध असणे बंधनकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावेळी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग संयुक्त कारवाई करणार आहेत. यासंदर्भात देखील तिन्ही सनदी अधिका-यांची एकत्रीत बैठक झाली असुन यासंदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. येणारे लॉकडाऊ न अत्यंत कडक राहणार असल्यामुळे नागरिकांनी देखील मोकाट फिरणा-यांची माहिती द्यावी असे आवाहन देखील पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − fifteen =

Close