मैदानी चाचणी गैर हजर राहिलेल्या उमेदवारांना 4 जुलै रोजी पुन्हा एक संधी-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे


नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना कोणत्याही कारणामुळे मैदानी चाचणीत उपस्थित राहता आले नाही. त्यांच्यासाठी दि.4 जुलै 2024 रोजी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील सुचनेप्रमाणे वेळेवर पोलीस मुख्यालय मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
दि.19 जूनपासून नांदेड जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात मैदानी चाचण्या होत आहेत. काही कारणामुळे अनेक उमेदवार त्यांना दिलेल्या तारेखत मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. उमेदवारांच्या विनंतीप्रमाणे त्यांच्या अर्जावरून त्यांना तारीख वाढवून देण्यात आलेली आहे.
19 जूनपासून सुरू असलेल्या मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार गैरहजर राहिले त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय भरती समितीने घेतला असून अनूउपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणी देण्यासाठी 4 जुलै 2024 रोजी प्रवेश प्रक्रियेतील वेळेप्रमाणे उमेदवारांनी पोलीस मुख्यालय मैदान नांदेड येथे वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.


Share this article:
Previous Post: हिमायतनगरजवळ दरोडा – VastavNEWSLive.com

June 29, 2024 - In Uncategorized

Next Post: तोतय्या पोलीस बनुन 8 लाख 22 हजारांना लावला चुना – VastavNEWSLive.com

June 29, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.