‘मेटा’चे शेअर्स घसरले; अभियांत्रिकी भरतीत घट

Read Time:1 Minute, 45 Second

न्यूयॉर्क : ‘मेटा’ प्लॅटफॉर्मने २०२२ मध्ये अभियंते घेण्याचे उद्दिष्ट कमी केले आहे. कंपनीने सांगितले की, ते आता २०२२ मध्ये केवळ ६ ते ७ हजार अभियंत्यांना कामावर घेणार आहेत. तर, यापूर्वी कंपनीने १०,००० नवीन अभियंते घेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते, अशी माहिती कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली.

‘मेटा’ कंपनीचे शेअर्स सुमारे ४३ टक्क्यांनी घसरलेले असताना नोकर भरतीत कपात करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मेटा आता येत्या काही वर्षांत ‘मेटाव्हर्ज’वर $10 अब्ज खर्च करण्याची शक्यता आहे. मेटा प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमच्या कंपनीतील मुख्य प्राधान्यांचे मूल्यांकन करत आहोत आणि त्याच दृष्टीने बदल करण्याचा आमचा विचार आहे.

विशेषत: ते आमच्या मुख्य व्यवसाय आणि रियल्टी लॅबशी संबंधित आहे. जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्क फर्म ‘मेटा’ला या वर्षी ‘फेसबूक’द्वारे नोंदवलेल्या वापरकर्त्यांमध्ये मोठा तोटा झाला आहे, त्यामुळे ‘मेटा’चे बाजार मूल्याच्या जवळपास निम्मे नुकसान झाले आहे. त्यामुे कंपनीने अभियांत्रिकी भरतीमध्ये जवळपास ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − 10 =