मृत्यूआधी सायरस मिस्त्री यांच्यासोबत नेमकं काय घडलं?, महत्त्वाची माहिती समोर

Read Time:3 Minute, 8 Second


मुंबई | टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) हे गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होते. पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. ते ज्या मर्सिडीज कारने येत होते, ती कार पालघर जिल्ह्यात अपघातग्रस्त झाली.

सूर्या नदीवरील पुलाच्या डिव्हायडरला कार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारमध्ये मागच्या बाजूला बसलेले सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) आणि त्यांच्यासोबतच मागे बसलेला आणखी एक प्रवासी यांचा जागच्या जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या सहप्रवाशानेही सीट बेल्ट लावलेला नव्हता.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) त्यांच्या महागड्या मर्सिडीज कारने प्रवास करत होते. कारमध्ये ड्रायव्हरसह तीन जण असे एकूण चार जण होते. यामध्ये स्वत: सायरस मिस्त्री, जहांगीर दिनशा पंडोले, अनायता पंडोले, दरीयस पांडोले यांचा समावेश होता. अपघातात सायसर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तीनही जण गंभीर जखमी झाले होते.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) हे व्यावसायिक जगतात सामान्य नाव नाही. ते प्रसिद्ध भारतीय वंशाचे खरबापती पलोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र आहेत.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला. 1992 मध्ये सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी भारतातील आघाडीच्या वकीलांपैकी एक असलेल्या इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि एंड जॉन कॉनन स्कूलमधून केले. त्यानंतर ते सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी लंडनला गेले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याच्याकडेही वडिलांप्रमाणे आयरिश नागरिकत्व आहे.

दरम्यान, दोन पेक्षा जास्त एअरबॅग (Airbag) असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्नही उपस्थित होतोय.

कारमध्ये तरुण-तरुणीचं चालू होतं नको ते कृत्य, अचानक चोर आला आणि…

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा KISS करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

Leave a Reply

Your email address will not be published.

6 + nineteen =