“मुख्यमंत्र्याचं अपयश पंतप्रधान मोदींना निस्तरावं लागतंय”

Read Time:2 Minute, 16 Second


मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन (Foxconn) ग्रुपचा प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यामुळे शिंदे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यातच आता काँग्रेसनेही थेट केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.

हा प्रकल्प गुजरातला गेल्याने केवळ महाराष्ट्राचेच (Maharashtra) नव्हे तर देशाचेही नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत केला आहे.

महाराष्ट्रातून या प्रकल्पासाठी अनेक सवलती आणि भांडवली अनुदान दिलं होतं. एवढं असूनही हा प्रकल्प गुजरातमधील (Gujarat) ढोलारा येथे नेण्यात आला. हा निर्णय केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली घेण्यात आला, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

गुजरातमधे मुख्यमंत्रीपद (Chief Ministership) बजावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक प्रकल्प पाण्यात घालवले आहेत, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या

काळजी घ्या! पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

“गद्दारी करणारे परत निवडून येणार नाहीत”

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen + 17 =