“मुख्यमंत्री शिंदे पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलाय मुलगा”

Read Time:2 Minute, 15 Second

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. (Political news) हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. याबाबत एक फोटो राष्ट्रवादीचे पदाधिकारी रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी ट्विट केला आहे.

मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आपल्या चिरंजीवांना सरकार चालवण्यासाठी पुढे केलं आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. आता यावर काँग्रेसने देखील टीका केली आहे.

मुख्यमंत्री झालेत शिंदे पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलाय मुलगा. अरे ते मुख्यमंत्री पद आहे की संगीत खुर्ची?, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसने केलीये.

दरम्यान,सत्ताधारी शिंदे गटाकडून आरोपानंतर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जो फोटो व्हायरल होत आहे. तो माझ्या कार्यालयातील आहे. यापाठिमागे कोणतेही हेतू नाही. अनावधाने ‘मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन’ हा फलक येथे आहे, असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदेंनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − eight =