“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन


नांदेड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये डीबीटी प्रणाली द्वारे निधी वितरीत करण्यात येणार आहे.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण, विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.


Share this article:
Previous Post: बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 8, 2024 - In Uncategorized

Next Post: राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम

July 8, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.