मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातूनयुवक युवतीना उद्योजक होण्याची संधी


 

नांदेड,(जिमाका)- विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येते. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

 

 

या योजनेतर्गत अर्जदारांना उत्पादन व्यवसाय (उदा. बेकरी, पशुखाद्यनिर्मिती, फॅब्रीकेशन ) व सेवा उद्योग (उदा. वैद्यकीय सेवा, ब्युटीपार्लर, सलून) साठी अर्ज करता येतील. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या योजनेचे https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार हा सर्वसाधारण प्रवर्गात 18 ते 45 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 50 वर्षे असावा. अर्जदाराने केंद्र, राज्य शासनाच्या योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा. अर्जदारास आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड , शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी लोकसंख्येचा दाखला इ. वेबसाईटवर अपलोड करावेत.

 

 

 

तरी नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवती यांना नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे किंवा व्यवसायवाढ करावयाची आहे त्यांनी https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच ही योजना राबविण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही व त्रयस्थ/मध्यस्थ व्यक्तींकडून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता अर्जदारांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.


Post Views: 24


Share this article:
Previous Post: तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार

June 27, 2024 - In Uncategorized

Next Post: हिमायतनगरजवळ दरोडा – VastavNEWSLive.com

June 29, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.