मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

Read Time:1 Minute, 5 Second

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − 6 =