January 25, 2022

मुख्यमंत्री ऊद्धव ठकरेंना गांभीर्याने घेऊ नका, त्यांना जोक करण्याची सवयच आहे – नाना पटोले

Read Time:1 Minute, 59 Second

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर भाजपाचे मंत्री रावसाहेब दानवे बसलेले असतांना केलेल्या भावी सहकारी या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ ऊडवून दिली आहे. महाविकासआघाडी व भाजपातील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यानच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंच्या त्या विधानाला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांना थट्टा-मस्करी, जोक करण्याची सवयच आहे. आणि त्यांनी यावेळीसुद्धा जोकच केला असल्याचे पटोले यावेळी म्हणाले आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त ऊद्धव ठाकरे औरंगाबादेत होते. या कार्यक्रमास केंद्रिय राज्य रेलंवे मंत्री रावसाहेब दानवेसुद्धा ऊपस्थित होते. “व्यासपीठावर ऊपस्थित सर्व आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी” असे विधान ऊद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरवातीस केले आणि राजकीय क्षेत्रात खळबळ ऊडवून दिली.

ऊद्धव ठाकरेंच्या या विधानाकडे वेगवेगळ्या कंगोर्‍यातून बघितले जाते आहे. महाविकसआघाडीसह भाजपांतून यावर प्रतिक्रिया ऊमटत आहे. मात्र ऊद्धव ठाकरे व रावसाहेब दानवे यापैकी कुणिही यावर अद्याप माध्यमांसमोर येऊन बोललेले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + 2 =

Close