मुखेड पोलीसांनी तीन घरफोडीचा एक गुन्हा दाखल केला


नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एक आडत दुकान फोडून चोरट्यांनी 15 हजार रुपये चोरले आहेत. तसेच मौज जांभळी ता.मुखेड आणि मौजे केरुळ ता.मुखेड येथे तीन घरफोडून चोरट्‌यांनी 1 लाख 79 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
बालासाहेब केशवराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जांभळी येथील त्यांचे घर आणि मौजे केरुर येथील सुशिलाबाई सुर्यभान शिंदे आणि ज्ञानोबा आनंदा पवार रा.जांभळी असे तिन जणांचे घरफोडून चोरट्यांनी त्यातून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 79 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचा एकच गुन्हा क्रमांक 115/2024 मुखेड पोलीसांनी दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मंचक फड यांच्याकडे देण्यात आला आहे.
देगलूर येथील राम विश्र्वनाथ मैलागिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 एप्रिलच्या रात्री 8.30 ते 4 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेदरम्यान देगलूर येथील मोंढा मैदानात त्यांचे दुकान राधेशाम ट्रेडींग कंपनीचे चॅनलगेट काढून चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. पण ते तुटले नाही. तेंव्हा टिनपत्रांच्या शेडवर जावून पत्रे सरकवून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला आणि लोखंडी कपाटात ठेवलेेले रोख 15 हजार रुपये चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार पत्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.


Post Views: 14


Share this article:
Previous Post: मलनिसारण केंद्रात मरण पावलेल्या तिघांच्या संदर्भाने फक्त आकस्मात मृत्यू दाखल

April 5, 2024 - In Uncategorized

Next Post: मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर ;शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात

April 5, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.