मुखेडमध्ये जमीनीच्या खरेदी खतात खोट्या चतु:सिमा दाखवल्या


नांदेड(प्रतिनिधी)-एक हेक्टर 33 आर जमीन खरेदी करतांना खरेदी खतात खोट्या चतु:सिमा दाखवल्याप्रकरणी नांदेडच्या एका व्यक्तीवर मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुखेड नगर पालिकेत लिपीक असणाऱ्या भारत लक्ष्मण गजलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेत सर्व्हे क्रमंाक 52-1/1 यातील एक हेक्टर 33 आर जमीन विक्रम अफसर पठाण रा.बाबानगर नांदेड याने खरेदी केली. पण खरेदी खत क्रमांक 2388 मध्ये खरेदी केलेल्या जागेच्या चतु:सिमा प्रत्यक्षात मुखेडमध्ये आहेत त्याप्रमाणे नसून खोट्या दाखवल्या आहेत आणि नगरपालिकेत ते कागदपत्र खरे आहेत असे भासून दाखल केले आहेत. खरेदीखत 26 मार्च 2019 रोजी झालेले आहे.
मुखेड पोलीसांनी हा फसवणूकीचा प्रकार गुन्हा क्रमांक 182/2024 नुसार दाखल केला असून त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 420, 464, 465, 468, 471 जोडली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.


Post Views: 7


Share this article:
Previous Post: महामार्गात जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 25 पोलीस अंमलदार कार्यमुक्त

June 13, 2024 - In Uncategorized

Next Post: किनवटमध्ये 2 लाख 30 हजारांची चोरी – VastavNEWSLive.com

June 13, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.