मुंबई पोलीसांसमोर उर्फीचं मोठं वक्तव्य म्हणाली…

Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 6 Second


मुंबई । उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांचे वाद दिवसेंदिवस वाढत चालेत. या शिवाय दोघींमधील ट्विटर वाॅर सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये. चित्र वाघ यांनी उर्फीच्या फॅशनस्टाईलमुळे तिच्यावर कारवाई करण्यास सांगितलं होतं. दरम्यान त्यावरून अनेक तर्क-वितर्क सुरु झाले.

Advertisements

एवढचं नाही तर राजकारणातील अनेक नेते मंडळींनी यावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सुद्धा या वादात उडी टाकली होती. अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, उर्फीनं जे काही केलंय त्यात काही चुकीचं नाही. तिनं जे काही केलं ते स्वतःसाठी केलंय.

अमृता फडणवीस यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवर सुद्धा उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून पुन्हा निशाणा साधला. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा.

आता यावर उर्फीनं थेट पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब दिला. मुंबईतील आंबोली पोलीस स्टेशन येथे तिनं ‘माझ्या पसंतीने मला कपडे घालण्याचा अधिकार आहे’, असं वक्तव्य केलं आहे.

माझ्या व्हायरल होत असलेल्या फोटोना मी थांबवू शकत नाही. असं देखील उर्फी म्हणाली. माझ्या कामासाठी मला असे कपडे घालावे लागतात आणि मी ते घालते. कामामध्ये असताना मला कपडे बदलायला वेळ नसतो.

माझ्या पसंतीने कपडे घालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मला राज्यघटनेनं दिलाय. मी जे कपडे घातले ते माझ्या पसंतीचे घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही असंही उर्फी यावेळी म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

”दही साखर तूप, रवी मला आवडतात खूप”

‘होम मिनिस्टर’ पोहचले राणादा आणि पाठकबाईंच्या घरी

मोठी बातमी! नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

“मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’; चित्रा वाघ पुन्हा भडकल्या

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *