मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Read Time:2 Minute, 10 Second

मुंबई : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ ते १२ जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणा-या सर्व यंत्रणा, सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे आणि परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश दिले आहेत.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणा-या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशा-यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक घेतली.

मुंबई महापालिकाही सज्ज
मुंबईत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते, अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. या पंपाद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. हिंदमाताच्या परिसरात २ मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =