मुंबईत ७ किलो युरेनियम जप्त…

मुंबई : अणुबॉम्ब बनविण्यासाठी लागणारे तब्बल ७ किलो युरेनियम महाराष्ट्रातील दहशतवादीविरोधी पथकाने जप्त केले असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. जिगर पांड्या (रा. ठाणे), अबू ताहीर (रा. मानखुर्द) अशी आरोपींची नावे आहेत. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारात २१ कोटी रुपये एवढी किंमत आहे. त्यामुळे मुंबईत आजवरची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

आण्विक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी युरेनियमचा वापर केला जातो. हे आरोपी युरेनियम खरेदीदाराच्या प्रतीक्षेत होते. त्यावेळी एटीएसने सापळा रचून त्यांना पकडले. हे युरेनियम भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरकडे चाचणीसाठी पाठविले होते. यामध्ये हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेला युरेनियम बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने सापळा रचून मुंबईतील नागपाडा येथून अणु ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत दोघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव जिगर पांड्या असे आहे. जिगरकडे चौकशी केली असता त्याला त्याचा मित्र अबू ताहिर याने हे युरेनियमचे तुकडे पुरवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांना एक व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कुठून आणि कसा आला, याचा सध्या शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × one =

vip porn full hard cum old indain sex hot