January 19, 2022

मुंबईत २० हजारांवर नवे रुग्ण

Read Time:1 Minute, 33 Second

मुंबई : राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मुंबईत पुन्हा एकदा २० हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली झाली. गेल्या २४ तासांत मुंबईत २०,३१८ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात मुंबईतील देशातील सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे समजते. गेल्या ३ दिवसांपासून मुंबईत २० हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १,०६,०३७ इतकी झाली आहे.

मुंबईच्या रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी २१ टक्के खाटा सध्या भरल्या आहेत. येत्या आठवडाभरात मुंबईत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता यापूर्वीच टास्क फोर्सकडून वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी १ जानेवारीला मुंबईत ८०८२ रुग्ण आढळले होते, तर ४ जानेवारीला १०,८६०, ५ जानेवारीला १५,१६६ रुग्ण आढळले होते. ६ जानेवारीला हा आकडा २०,१८१ वर जाऊन पोहोचला होता, तर ७ जानेवारीला कोरोना रुग्णांची संख्या २०,९७१ इतकी झाली होती. आज हा आकडा २०,३१८ इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + seven =

Close