May 19, 2022

मुंबईत २० मजली इमारतीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू

Read Time:4 Minute, 20 Second

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या ताडदेव परिसरात शनिवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एका २० मजली इमारतीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, या इमारतीच्या १८व्या मजल्यावर ही आग लागली. या आगीत १५ जण जखमी झाले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाना चौक गवालिया टँक येथील २० मजली कमला इमारतीत शनिवारी सकाळी भीषण आग लागली. साधारण साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या १८ व्या मजल्यावर ही आग लागली असून, त्यात १५ जण जखमी झाले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी १३ अग्निशमन बंब, ७ जम्बो टँकरसह घटनास्थळी पोहोचले.

कर्मचा-यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. भाटिया रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जण जखमी झाले असून, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात कस्तुरबा रुग्णालयातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नायर रुग्णालयातील मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत सात जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

रुग्णालयाचा उपचारास नकार
ताडदेव परिसरातील कमला इमारतीला लागलेल्या आगीत होरपळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणा-या दक्षिण मुंबईतील रुग्णालयांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. परंतु, रिलायन्स, व्होकार्ट आणि मसिना या तीन रुग्णालयांनी जखमींना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला.

केंद्राकडून मदत जाहीर
पंतप्रधान कार्यालयाने या दुर्घटनेनंतर काही तासांतच मृत आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार या दुर्घटनेतील मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत
मुंबईच्या ताडदेव परिसरातील नाना चौक भागात असणा-या कमला इमारतीला आग लागली. या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.

आदित्य ठाकरे, पेडणेकरांनी केली पाहणी
घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचल्यानंतर त्यांनी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − 6 =

Close