“मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना…”

Read Time:1 Minute, 11 Second

Photo Credit- Facebook/ Uddhav Thackeray & Amit Shaha

मुंबई | मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे, असं अमित शहा म्हणालेत.

राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे, असं अमित शहा म्हणालेत.

वर्ष 2019 मधे पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + twelve =