मुंबईत मृत्यूचे तांडव; पावसाने दाणादाण, दरड, संरक्षक भिंत, इमारत कोसळली, ३० मृत्युमुखी

मुंबई : मुंबईच्या अनेक भागांत शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागांत तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली. जोरदार पावसादरम्यान चेंबूरमध्ये मध्यरात्री डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत आणि दरड लगतच्या घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, एनडीआरएफचे पथक, महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, अग्निशामक दलाच्या मदतीने मदत व बचावकार्य करण्यात आले. यात ६ जणांना वाचवण्यात यश आले. ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते. दरम्यान, विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून १० जणांचा, तर भांडूपमध्ये १ जणाचा मृत्यू झाला.

चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारतनगरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी बचाव यंत्रणेलाही माहिती देण्यात आली. तसेच एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या. या भागात सकाळी पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामुळे नेहमीच या भागात अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती. त्यातच मध्यरात्री डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली या घरांमध्ये राहणारे लोक दबले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली.

दरम्यान, एकीकडे चेंबूरमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईच्या विक्रोळीतही सूर्यनगर परिसरात एक दुमजली इमारत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बचावपथके दाखल झाली असून माती, दगडांचा खच हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगा-याखाली आणखी कुणी दबले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. चेंबूर आणि विक्रोळीप्रमाणेच भांडुपमध्येदेखील संरक्षक भिंत कोसळून एका १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सोहम थोरात असे या मुलाचे नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागात वनविभागाची भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

५० मीटरच्या अंतरावर २ घटना
एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार या भागात ५० मीटरच्या अंतरावर दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जणांचा वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 9 =

vip porn full hard cum old indain sex hot