May 19, 2022

मुंबईत दुस-या डोसनंतर फक्त २६ कोरोनाबाधित

Read Time:1 Minute, 53 Second

मुंबई : कोरोना व्हायरसवर लसच एकमेव प्रभावी शस्त्र असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणावर सर्वांत जास्त जोर दिला जात आहे. याची प्रचिती मुंबई येथे आली असून दुस-या डोसनंतर केवळ २६ जण कोरोनाबाधीत झाले असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने १ जानेवारी ते १७ जूनदरम्यान सुमारे ३ लाख कोरोनाबाधीतांचा सर्वे केला. दरम्यान, यात लसींचा दुसरा डोसच नव्हे तर पहिला डोस ही अधिक चांगले कार्य करत असल्याचे दिसून आले.

सर्वेक्षणानुसार २.९ लाख लोकांमधून २६ लोक दुसरा डोस घेतल्यानंतर तर १० हजार ५०० लोक पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले. मुंबईत १ जानेवारी ते १७ जूनदरम्यान सुमारे ४४ लाख ९४ हजार १२३ लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली होती. विशेष म्हणजे यातील केवळ ०.२३ टक्के कोरोनाबाधीत झाले होते.

मुंबईत १० लाख लोकांना दोन्ही डोस
राज्यात गेल्या काही दिवसांपासून १८ ते ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत आतापर्यंत ५३.८३ लाख लोकांचे लसीकरण झाले असून यातील १० लाख लोकांना कोरोना लसींचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 5 =

Close