January 21, 2022

मुंबईत कोट्यवधींचा हेरॉईनचा साठा जप्त

Read Time:1 Minute, 56 Second

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी मुंबईत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. मुंबईतील विलेपार्ले परिसरातून कोट्यवधी रुपये किमतीचा हेरॉइनचा साठा जप्त केला आहे. एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांची तस्करी करणा-यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील ड्रग्जविरोधी कारवायांमुळे चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले भागात पुन्हा मोठी कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. एनसीबीनेच याबाबत माहिती दिली. एनसीबीच्या पथकाकडून या प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही एनसीबीकडून सांगण्यात आले.

नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई करण्यात आली होती. डीआरआयने झोनल युनिटने २५ किलो हेरॉइनचा साठा जप्त केला होता. एका कंटेनरमधून हा साठा हस्तगत करण्यात आला होता. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे १२५ कोटी रुपये होती. सप्टेंबरमध्येही डीआरआयने २,९८८.२१ किलो हेरॉइन जप्त केले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार कोटी इतकी किंमत होती. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. त्याआधीच डीआरआयने या प्रकरणात आठ जणांना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + six =

Close