मुंडे, राऊत यांनी घेतली गडकरींची भेट

Read Time:2 Minute, 21 Second

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज सकाळी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ लगेचच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हेही गडकरी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या. भेटीनंतर या दोन्ही नेत्यांनी विकास कामांबाबत गडकरी यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले.

पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. दस-याच्या दिवशी भगवान गडावर झालेल्या सभेत त्यांनी, मला मखमली खुर्चीवर बसविणारा कोण नेता माझ्या मागे आहे, असा भावनिक प्रश्­न त्यांनी उपस्थितांना विचारला. तसेच भाषणाच्या शेवटी, ‘कब तक तुम रोकोगे मुझे, असा शेर म्हणत नाराजीचे सूतोवाचही त्यांनी केले होते. त्या पाश्­र्वभूमीवर त्यांनी आज गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ विनायक राऊतही गडकरी यांच्या निवासस्थान पोचले. त्यामुळे भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

मराठवाड्याच्या विकासकामांबाबत भेट : मुंडे
गडकरी यांना भेटून बाहेर पडताना मराठवाड्यातील विकास कामांबाबत ही भेट होती, असे पंकजा यांनी सांगितले, तर राऊत यांनी, मुंबई-गोवा महामार्गाबाबत गडकरी यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. पंकजा यांना यावळी शहा आणि फडणवीस यांच्या काल झालेल्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता, साखर उद्योगासंबंधीच्या शिष्टमंडळात मी नव्हते. त्यामुळे त्यावर मला भाष्य करायचे नाही, असे त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × one =